Posts

Showing posts from July, 2015

वटपौर्णिमा

This Post is for the Marathi literate only. I just could not find the right words in English to express my sentiments and opinions about an age old ritual of Vat Pournima, observed by Indian women for the long life of their husbands. This was written on the day of the Vat Pournima, but uploading it today for all the blog readers... आज वटपौर्णिमे  च्या दिवशी रस्त्यावर असणार्‍या वटवृक्षांभोवती फेरे घालताना महिला दिसल्या आणि आपण मानव जात एखाद्या केवळ रूढी मध्ये कसे अडकून पडतो हा विचार मनात आला. काही वर्षांपूर्वी सौ. मंगला सावंत ह्यांचा 'गणपती बाप्पा मोरया' हा लोकसत्ता मधील लेख वाचला होता. त्या मध्ये मंगलाताईं नी प्राचीन भारतातील मातृसत्ताक पद्धती बद्दल लिहिले होते. इतिहास सांगतो की भारतात पूर्वी ज्या टोळ्या होत्या, त्याचे नेतृत्व बायका करायच्या. ह्या टोळ्यातील बायका जंगलात राहून आपल्या टोळीतील सदस्यांसाठी फळे, कंदमुळे गोळा करून आपला उदारनिर्वाह करायच्या. हे करित असताना काही हुषार महिलांना आयुर्वेदाचे शास्त्र समजू लागले होते व त्या जंगलातील सामग्री वापरुन रोगांवर उपचार करायच्या अस